दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर (माढा): टेंभुर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर यांच्या वतीने नरसिंह नगर येथे भव्य श्री गणेश मंदिर उभारण्यात येत असून सर्व स्तरातून लोक त्यांना मदत करत आहेत.आतापर्यंत स्लॅप लेव्हलपर्यंत बांधकाम पूर्ण झाले असून त्याकरता ४,५०,०००/-रुपये खर्च करण्यात आला आहे या मंदिराचे शिखर बांधकाम शिल्पकार श्री गणेश भोसले, बीड यांना देण्यात आले असून येत्या गुरुवारपासून शिखर बांधकामाचे काम सुरु करण्यात येणार आहे.
नरसिंह प्रतिष्ठानचे सभासद श्री. सनी गायकवाड हे गेल्या सहा वर्षापासून अमेरिका व कॅनडा येते विदेशात खाजगी नोकरी करतात. आपल्या नरसिंह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने व प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करतात त्यांना या कार्यात मदत करण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच सनी गायकवाड यांनी त्यांच्या कॅनडा येथील मित्र परिवाराकडून १,००,०००/-रुपये (एक लाख रुपये) मदत जमा करून नरसिंह प्रतिष्ठान कडे सुपूर्द केली आहे.. त्यामुळे आता श्रीगणेश मंदिर बांधकामाच्या कामाला वेग येणार असून लवकरच भव्य दिव्य गणपती मंदिर उभारण्यात येणार असल्याची माहिती नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार, उपाध्यक्ष सुरज गायकवाड, सचिव -अभिजित गायकवाड, आकाश पवार यांनी दिली आहे.
या वेळी सनी गायकवाड यांनी बोलताना सांगितले की मी नरसिंह प्रतिष्ठानचा सभासद असून नरसिंह नगर येथेच लहानाचा मोठा झालो आहे. माझे सहकारी मित्र खूप चांगले सामाजिक कार्य करत आहेत याचा मला अभिमान आहे या त्यांच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत.आणि या मंदिरासाठी अजुन अर्थिक मदत लागल्यास मी कोणताही विचार न करता देईल असे सांगितले.