
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी २५ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केल्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाला पाठिंबा म्हणून उस्माननगर (मोठीलाठी ) तालुका कंधार येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील राष्ट्रीय महामार्ग लगत आमरण उपोषणाला २८ऑक्टोबर शनिवारी पासून उपोषणाला सुरुवात झाली व जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना व नेत्यांना गावात प्रवेश बंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय असल्याचे मराठा बांधवांनी उस्माननगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीराम लक्ष्मण पाटील काळम यांनी जिल्हाधिकारी व उस्माननगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले की, २८ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या येथील राष्ट्रीय महामार्ग लगत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून या लढ्यास पाठिंबा म्हणून येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राजकीय पुढारी व नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला असून सदरील बाबतचे निवेदन संबंधित विभागांना दिले आहे.
मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून या लढ्यास पाठिंबा म्हणून उस्माननगर येथील उपोषणकर्ते श्रीराम लक्ष्मण पाटील काळम व समाज बांधवांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही , तोपर्यंत राजकीय पुढार्यांना व नेत्यांना गावबंदी करण्यास व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजास शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे .त्यांचा विचार करून समाजास तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली त्याची निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर गावाचे ग्रामस्थ समाज बांधवाच्या वतिने अमरण उपोषण सुरू केले आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
चौकट :- उपोषण कर्ते श्रीराम पाटील काळम यांची ५ वर्षापुर्वी अंजॉग्रफी केली असल्याने त्याना चक्कर, बीपी दि.२९ ऑक्टोंबर रोजी वाढली होती त्यांचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानगर येथील वैद्यकीय अधिकारी हे करित आहेत.