
महाराष्ट्रातील पहिली महिला बसणार आमरण उपोषणाला…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :-नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील कळका येथे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाप्रमाणे करुणा नारायण गायकवाड वय ३७ वर्षे कळका येथील रहिवासी असून ती दिनांक ३१/१०/२०२३ रोज मंगळवार सकाळी ११ पासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून ५०% टक्काच्या आत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे कळका गावातील महिला करुणा गायकवाड आमरण उपोषणाला बसणारी महाराष्ट्रातील पहिली महिला असून तिने मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाप्रमाणे आमरण उपोषणास बसणार असल्याचे तहसीलदार कंधार, उपविभागीय अधिकारी कंधार,पोलीस स्टेशन कंधार यांना निवेदन देऊन कळविण्यात आले असून महाराष्ट्रातील पहिली महिला मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे असे सकल मराठा समाज कळका यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन सरकारला कळविण्यात आले आहे…