
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:-श्री साहेबराव रामकिशण वसुरे उपसरपंच हाळदा यांनी असा ठराव मांडला की, मौजे हाळदा ता. कंधार येथे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत “गावातील पदाधीकारी वगळता इतर गावच्या पदाधीकारी व नेते मंडळीना”गावात ताफ्यासह येणे, जाहीर सभा घेणे यावर गावबंदी करण्यात यावी तसेच गावातील राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास मुभा असेल परंतू राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी असावी असा ठराव मांडला.
सदर ठरावावर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेअंती सर्वानुमते ठराव मंजुर करण्यात आला अनु.श्री गणपती यलप्पा पवार यांनी अनुमोदन दिल्यावरुण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.यामुळे सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या मते ग्रामपंचायत कार्यालय हाळदा ता.कंधार येथे मराठा आरक्षणा करिता पदाधीकारी व नेते यांना गावबंदी करण्यात आली आहे.