
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- नांदेड जिल्हातील लोहा तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च चे आयोजन केले होते.सकल मराठा समाज लहान थोर मंडळी महिला गावातील पदाधिकारी जेष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सरकारचा जाहीर निषेध करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून कोर्टात टिकणारे ५०℅ आतून आरक्षण देण्यात यावे यासाठी पिंपळदरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.