
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड शहरातील तरोडा खुर्द गावात सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल रॅली काढून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या कॅण्डल रॅलीमध्ये विद्यार्थी,विद्यार्थिनी ,माता ,भगिनी, तरुण ,तरुणी ,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा बांधव व भगिनी यांनी आपल्या भावना सरकार समोर मांडल्या ते म्हणाले जर मराठा विद्यार्थ्याला ६५० मार्क पडून सुद्धा तो पात्र ठरत नाही आणि त्यांच्याच वर्गातला आरक्षणवाला विद्यार्थी ४५० मार्क पडून पात्र ठरत आहे .त्यामुळे आमची मुले डिप्रेशन मध्ये जात आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला दोन किलो गहू आणि पाच किलो तांदळासाठी आरक्षण पाहिजे नाही .आम्हाला शिक्षण आणि नौकरीसाठी आरक्षण पाहिजे मराठा समाज हा शेती करत असल्यामुळे त्यांना कुणबी असे म्हणत असत पूर्वीच्या काळी आम्हाला शंभर शंभर एकर जमिनी होत्या त्या आता गूंठ्यावर आलेल्या आहेत त्यामुळे आम्ही गुंठ्यामध्ये शेती कशी करायची ती परवडत नसल्यामुळे आम्ही शिक्षणाकडे वळलो असता आरक्षण नसल्यामुळे मोठे नुकसान होत आहे .त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही कॅण्डल रॅली का काढली तर मेणबत्ती ज्याप्रमाणे स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते त्याप्रमाणे मनोज दादा जरांगे हे मराठा समाजासाठी स्वतः अन्न पाण्याचा त्याग करून मराठा समाजासाठी आमरण उपोषण करत आहेत आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाठी संपूर्ण तरोडा खुर्द गाव पाठिंबा देऊन साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी तरोडा खुर्द गावातील सकल मराठा समाज प्रचंड जण समुदायासह उपस्थित होता.