दैनिक चालु वार्ता
किशोर फड प्रतिनीधी बीड अंबाजोगाई
“सामाजिक कार्यकर्ते राजेश वाहुळे यांच्या अथक परिश्रमानानंतर मागणीला यश”
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने सन २०१०/११ ला यशवंतराव चव्हाण चौक येथे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चून अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल तथा अण्णाभाऊ साठे भाजी मंडई उभारली होती. अनेक वर्षांनी अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलातील भाजी मंडई ही विकासापासून दूर होती, अंबाजोगाई नगरपरिषद ला नव्याने आलेले मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांना आठ दिवसांपूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खरेदी-विक्री असोसिएशन तथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने भाजी मंडई तथा आठवडी बाजार सुरू करण्यात यावा अशी विनंती केली होती त्याच विनंतीला मान देऊन मुख्य अधिकारी गुट्टे साहेब यांनी शनिवार दिनांक २८/१०/२३ रोजी भाजी मंडई येथे भेट दिली असता, तेथे अनेक तात्काळ अंबाजोगाई नगर परिषद चे स्वच्छता विभागातील कर्मचारी व जेसीबी बोलून घेऊन साहेबांनी अण्णाभाऊ साठे भाजी मंडई ची पूर्णतः स्वच्छता करून घेऊन येथे जवळपास साठ (६०) लोकांना बसण्याची परवानगी दिली त्याच अनुषंगाने आज दिनांक ०३/११/२३ रोजी मंडाईची लाईट, पाणी व इतर मूलभूत व्यवस्था करून देण्यात यावे या आशयाचे सर्व भाजीविक्रेत्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असोसिएशनचे पदाधिकारी तथा लोक जनशक्ती पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.