दैनिक चालु वार्ता
किशोर फड प्रतिनीधी बीड
64 सुशिक्षित व बेरोजगार तरूणांना मिळाली बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी – प्रत्यक्ष मुलाखातीत तब्बल 40 तरुणींची लक्षणीय कामगिरी…
“सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे यांची विशेष उपस्थिती होती.”
सर्वाधिक तरुणाईचा देश म्हणून भारताची ओळख ही जागतिक स्तरावर झालेली आहे. यात मराठवाड्यातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे व त्यांच्यातील सुप्त गुणांच्या आधारे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन बजाज अलियांझ चे विभागीय प्रमुख व कार्यक्रमाचे उदघाटक संजीव श्रीवास्तव यांनी आई सेंटर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी मेळाव्यात केले.
यावेळी भारतातील विमा क्षेत्रातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुख्य कार्यालय – पुणे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई व प्रशिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारे इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात ‘आई सेंटर’ यांच्या पुढाकाराने “कॅम्पस इंटरव्ह्यू” चे आयोजन शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी यशवंत सभागृह, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय पाटील हे होते तर उदघाटक म्हणून बजाज अलियान्झचे प्रमुख पदावरील महाराष्ट्र आणि गोवा विभागीय प्रमुख संजीव श्रीवास्तव हे होते. विचारपीठावर क्षेत्र सहयोगी व्यवस्थापक सचिन शेट्टी, मुख्य रिटेल पार्टनर उषा शर्मा यांच्या समवेत प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ, प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष प्रमुख डॉ. इंद्रजीत भगत तसेच बजाज आलियांन्झ चे प्रशिक्षण भागीदार असणारे आई सेंटरचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोल बोलताना संजीव श्रीवास्तव (बिहार) यांनी आपल्या जडणघडणीत भाषेचे महत्व विशद करताना बहुराष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आपणास जागतिक भाषा इंग्रजी अतिशय मोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. आपले ज्ञान, कौशल्य, विचार व वर्तणूक हे व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असून आपण महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ यांनी केले तर परराज्यातून आलेल्या पाहुण्यांचा परिचय सर नागेश जोंधळे यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना करून दिला.
नोकरी मिळवून स्वतःला व परिवाराला अधिक सक्षम बनविण्यासाठी 229 उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाइन च्या माध्यमातून पूर्व नोंदणी केलेली होती. यातील एकूण 107 जणांपैकी 45 उमेदवारांनी ऑनलाइन व्हिडिओ माध्यमातून मुलाखात दिली व त्यापैकी 19 जणांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच, 62 उमेदवारांची मुलाखत ही ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष घेण्यात आलेली होती व त्यापैकी 47 जणांची निवड करण्यात आलेली आहे.
मुलाखातीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे व फोन करून कळविण्यात आलेले असून त्यांचे पुढील कार्यालयीन प्रक्रिया व नियुक्ती पत्र तसेच सुयोग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुलाखातीसाठीचा संघ
या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी बजाज अलीयांन्ज चे प्रमुख संजीव श्रीवास्तव व आई सेंटरचे प्रमुख सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली
सचिन शेट्टी (सोलापूर), उषा शर्मा (रायपूर), यांच्यासह शिवम चौधरी (दिल्ली),कु. तनुजा चौधरी (दिल्ली),
नागराज लिगाडे, योगेश पाडळे, शुभम नांदुरकर, चंदु ठाकरे (सर्व पुणे) यांनी अर्जदारांची मुलाखत घेताना त्यांच्यातील सुप्त गुण तसेच उणीवादेखील निदर्शनास आणून दिल्या व त्या भरून काढण्यासाठी सकारात्मक मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनोरमा पवार यांनी उत्कृष्टपणे केले तर डॉ.अरविंद घोडके यांनी उपस्थित मान्यवरांचे, तसेच सर्व प्राध्यापक, स्टाफ व मुलाखातीसाठी आलेल्या उमेदवारांचे ऋण व्यक्त केले.
हा “कॅम्पस इंटरव्ह्यू” यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे प्रमुख डॉ.इंद्रजीत भगत (वाणिज्य), डॉ.अरविंद घोडके (विज्ञान), व डॉ.दिलीप भिसे (कला) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई तसेच, आई सेंटर चे संदीप अंबेसंगे, सीताराम मनदुमले, प्रतिक गौतम, कु. योगेश्वरी पुदाले, कु. श्रुती शेकटकर, कु. प्रतिक्षा मस्के व सर्व फॅमिली मेंबर्सनीं परिश्रम घेतले.