दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)– वैजापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले.तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णीं,गणेश चौकडे, प्रवीण पंडित यांनी सकाळी अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यामधे पानगव्हाण मधून- मंदाबाई संतोष घायवट (सरपंच),देवराव पुंजाजी म्हस्के,योगिता चंद्रकांत घायवट,सुवर्णा घनश्याम घायवट,सोमनाथ मन्सूब कटारे,विमल गजानन घायवट, मिराबाई ज्ञानेश्वर पवार, बाळासाहेब विठ्ठल घायवट
आगटसायगाव मधून- गणेश भास्कर जाधव (सरपंच),सीताराम कारभारी जाधव,विठबाई परसराम माळी,वैशाली वाल्मिक वगदे,दीपक भरतसिंग डमाले,कौशाबाई रंभु जाधव,रामेश्वर गोरखनाथ जाधव,दीपाली गणेश साळवे
भिंगी मधून- भागुबाई शिवनाथ शेवाळे (सरपंच),भागिनाथ लहानू गायकवाड,उज्ज्वला किलास घायवट,प्रीती अमोल घायवट,कैलास उत्तमराव घायवट,कमलाबाई कैलास गायकवाड,योगेश नामदेव घायवट,रंभाबाई बाबुराव गायकवाड
हे विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.