
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यातील दूर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्या पिंपळशेत(हेदीचापाडा) येथील गरीब कुटुंबातील देवजी हांडवा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.कुटुंबातील कर्ती कमावती व्यक्ती गमावल्याने हांडवा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.या दुःखद घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा परिषद सदस्या तथा पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गुलाबताई राऊत यांनी हांडवा कुटुंबियांच्या सांत्वनासाठी धाव घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी हांडवा कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कपडे देऊन सदर कुटूंबाच्या पाठीवर मायेचा हात दिला.या भेटी दरम्यान जि.प शाळा तलावली व अंगणवाडी केंद्र यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व अंगणवाडी केंद्रातील लहान मुले तसेच कुपोषित बालकांची पाहणी करून विचारपूस केली.या भेटी प्रसंगी जव्हार पंचायत समिती सदस्या मीरा गावित,जव्हार पंचायत समितीचे माजी सदस्य विनायक राऊत,सामाजिक कार्यकर्ते नामदेव खिरारी,ग्रामपंचायत कोगद्याचे माजी सरपंच गणपत भोये,डेंगाचीमेट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर घाटाळ तसेच कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.