
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मंठा प्रतिनिधी:-सुशिल घायाळ श्रीक्षेत्र नांगरतास संन्यास आश्रमामध्ये सद्गुरूंचा पुण्यतिथी सोहळा तीन दिवसीय कार्यक्रम अगदी आनंदात आणि थाटामाटात निर्विघ्नपणे संपन्न झाला.निसर्ग सौंदर्याने सजलेल्या या आश्रमामध्ये गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भागवतगिरीजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि श्री महंत
बालकगिरीजी महाराज यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली परिसरातील सर्व गावातील सेवेकर्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सेवा दिली आणि आश्रम पुण्यतिथी सोहळ्यासाठी सज्ज केला.या तीन दिवसीय सोहळ्याच्या प्रथम दिनी गुरू श्री महंत सेवागिरीजी महाराज यांचा 13 वा पुण्यतिथी सोहळा सुरू झाला या मंगल दिवसाची सुरुवात संस्कार प्रबोधिनी गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठणाने केली , त्यानंतर सद्गुरूंच्या मूर्तीचे अभिषेक पूजन गुरुवर्य बाबाजी व बालक बाबाजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यानंतर ह.भ.प. प्राध्यापक श्री वामनराव वैद्य यांचे हरिकीर्तन झाले पुण्यतिथी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भक्त परिवाराला किर्तन श्रावणानंतर महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते.