
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव-दि.३-१२-२०२१ रोजी खान्देश कन्या कवयित्री संत बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिना निमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या मंडल क्र.४ तर्फे बहिणाबाई उद्यान जळगाव येथे बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश दामू भोळे (राजु मामा), महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, स्थायी समितीच्या माजी सभापती सुचीताताई हाडा, महानगर चिटणीस महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम सर, सोशल मीडिया चे अक्षय चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती ताई चिरमाडे, सुरेखा ताई पाठक, मंडळ अध्यक्ष अजित राणे, चेतन तिवारी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.