
पत्रकारितेच्या नावावर अनेक अधिकारी व राजकारणी आणि बिल्डरांची लूटमार
दैनिक चालू वार्ता पालघर
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडाच नवे तर आज अनेक ठिकाणी बोगस पत्रकारीत्या होत असताना आपल्याला दिसून येत असेल मी पत्रकार आहे अस सांगून अनेक लोकांनकडून लूटमार होत आहे पण पत्रकार कसा ओळखावा ही बाब लोकांच्या लक्षात आलेली नाही ज्यांच्या कडे पत्रकाराच आयडी आहे अश्या पत्रकारांना प्राधान्य द्या बोगस पत्रकारांना जाब विचारा त्यांचा आयडी तपासा तुमची जर फसवणूक होत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा.
पत्रकार हा एक असा व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळया घटना,प्रसंगांविषयी, भ्रष्टाचाराविषयी वेगवेगळया माध्यमांचा आधार घेऊन माहीती गोळा करत असतो आणि समाजातील लोकांपर्यत ती पोहचविण्याचे काम करत असतो. आणि ह्याच व्यवसायाला पत्रकारिता असे म्हटले जात असते.*
माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं, असंही सांगितलं जातं.
पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावं. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते. त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.
लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिलं नाही. युद्ध, दहशतवादी संघटनांच्या कारवायांबरोबरच हितसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो आहे. महाराष्ट्र सरकारनं देशात पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कायदा मंजूर केला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबतचा हा कायदा सध्या राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षेचं कवच प्राप्त होईल. कमिटी टु प्रोटेक्ट जर्नालिस्ट (C P J) या जागतिक पातळीवरच्या संघटनेच्या 1992 पासून 2016 पर्यंत अहवालात जगभरात 1236 पत्रकारांच्या हत्त्या करण्यात आल्या आहेत. जगभरातील कारागृहात 259 पत्रकारांना डांबण्यात आलयं.
पत्रकारिता हा व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन म्हणून स्विकारणे आणि छंद म्हणून किंवा एक मिशन म्हणून स्विकारणे या दोन्ही बाबतीत फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात.
दोन्ही प्रकारात पत्रकारांना सामाजिक मान्यता आहेच. वंचित आणि शोषित अन्यायग्रस्त लोकांना पत्रकारांचा आधार वाटतो व ही भावना सुखावह असणे हा फार मोठा फायदा पत्रकारांना असतो.
पत्रकार असण्याचा तोटा म्हणजे पत्रकार हे माध्यमातून बाजू मांडत असल्यामुळे दुखावलेले अनेक घटक हे पत्रकारांवर खुन्नस खाऊन असतात व त्यामुळे पत्रकारांना विरोध व टीका आणि तिरस्काराला सामोरे जावे लागते. अनेकदा पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. आणि हे सगळं भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असते. पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी या प्रकारतूनच आलेली आहे.
सामान्य लोकांना जिथे प्रवेश नसतो किंवा सामान्य लोकांची जिथपर्यंत पोच नसते तिथे पत्रकारांना सहज प्रवेश असतो आणि ते बिनदिक्कत पणे पेज थ्री किंवा सामान्यांच्या दृष्टिकोनातून सेलिब्रिटी असलेल्या लोकांमध्ये वावरत असतात. पत्रकारांचे व्यक्तिगत जीवन अशा महत्वाच्या संपर्कामुळे सहज होते. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात जी आव्हाने असतात जसे मुलांना शाळेत प्रवेश मिळणे, गॅस कनेक्शन, सरकारी कार्यालयांतून मिळणारी प्रमाणपत्रे व इतर सेवा याचा सहज लाभ पत्रकारांना होतो. शिवाय सरकारी यंत्रणा पत्रकारांना वचकून असते त्यामुळे पत्रकारांची व्यक्तिगत कामे सरकारदरबारी लवकर होतात. मोठंमोठे नेते, मंत्री हे सुद्धा पत्रकारांबद्दल भीतीयुक्त आदर बाळगून असतात. आपल्याला लोक घाबरतात व मान देतात ही भावना खूप सुखावह असते. जगण्याच्या प्रेरणा यामुळे बळकट होत जातात.
पत्रकारांचे जीवन मात्र धकाधकीचे असते. अत्यन्त गळेकापू अशी स्पर्धा या क्षेत्रात आहे. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट ही दोन्ही माध्यमे संख्येच्या दृष्टीने खूप सुळसुळाट झाला असे म्हणता येईल. यात मग चढाओढ आलीच. यात पत्रकारांचे मात्र मरण होते.
मालक व संपादक यांच्या प्राथमिकता वेगळ्या असतात. बरेचदा पत्रकाराला एखादी बाब जनसामान्यांच्या दृष्टीने महत्वाची वाटते व ती बातमी लागायला हवी असे वाटते पण तसे होत नाही. बातमी महत्वाची असणे व सनसनाटी कंटेंट त्यात असणे ह्या दोन्ही बाबी वेगवेगळया आहेत.
अशा परिस्थितीमुळे कामाच्या वेळा नसणे, मानधन हवे तसे ना मिळणे, कामातून समाधान प्राप्त न होणे, केसेस मागे लागणे असे सुद्धा प्रकार ऐकायला व वाचायला मिळतात. पत्रकारांच्या कामाच्या वेळा अशा असतात की त्यातून कुटुंबाला वेळ देणे कठीण होते. घडणाऱ्या घटनांवर कोणाचेच नियंत्रण नसते त्यामुळे त्या घटना रात्री बेरात्री घडल्या तरी कव्हर करणे क्रमप्राप्त असते व तो कामाचा भाग म्हणून गणल्या जातो. जीवावर बेतेल असे सुद्धा प्रसंग पत्रकारांच्या जीवनात येतात.
एखाद्या पत्रकाराला समाजातील एखादा किंवा अनेक समस्याविषयी सहानुभूती असते हा प्रश्न सुटावा यासाठी तो जिवाचे रान करतो पण तो ज्या माध्यमात काम करतो ती व्यवस्था कुणाच्या तरी दावणीला बांधली असते मग अशा वेळी पत्रकाराला प्रतिसाद मिळाला नाही तर येणारे वैफल्य कोणत्याच कसोटीवर मोजता येत नाही.