
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नांदुरा तालुका प्रतिनिधी.भारतीय बौद्ध महासभा नांदुरा तालुका वतीने समता सैनिक दल पदाधिकारी यांचा पदोन्नती निमित्त सत्कार समारंभ तक्षशिला सभागृह नांदुरा येथे आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित ,पीडित ,समाजाचे सुरक्षाकवच म्हणून समता सैनिक दलाची स्थापना दिनांक 20 मार्च 1927 ला केली. अशा समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणे हे गौरवास्पद आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे मेजर जनरल के. एम. हेलोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हाध्यक्ष एस. एल. वले यांना समता सैनिक दलाने मानवंदना दिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले व त्यानंतर वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. वले यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर आर .आर . जवरे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभा नांदुरा तालुका शाखा यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या संम्येक, संकल्प अंतर्गत वर्षावास कालावधीत ग्रंथवाचक व विश्लेषक यांना शुभ्र वस्त्र दिले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. समता सैनिक दलाच्या के.एम. हेलोडे, आर. ओ. सावंत, डी .एस .वले, श्रीरंग इंगळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदुरा तालुका अध्यक्ष दिलीप मेढे यांनी भूषविले होते. विचारपीठावर जिल्हा सरचिटणीस बी.के. हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष. छायाताई बांगर,तथा एल. एफ .मेढे, सुरेश गवांदे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा सचिव श्रीकृष्ण इंगळे तथा नांदुरा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अजाबराव वाघोदे, खामगाव शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे, सरचिटणीस जी .यु. गवई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा नांदुरा तालुका सचिव पंडित इंगळे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन निरंजन तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.डी. सरदार, प्रशांत मेढे, सिताराम वाकोडे, करण मेढे, आम्रपाल अंभोरे, संतोष इंगळे, दशरथ दांडगे ,सागर मेढे ,बाबुराव वाकोडे, तसेच नायगाव व तक्षशिला नगर नांदुरा येथील उपासक-उपासिका यांनी मोलाचे सहकार्य केले.