
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक एडस निर्मूलन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व संजय चौधरी उपस्थित होते.
यावेळी जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने या वर्षाचे घोषवाक्य ” असमानता संपवा, एडस संपवा, महामारी संपवा” हे घोषवाक्य घेऊन जनजागृतीपर शपथ घेण्यात आली.
तसेच रांगोळी पोस्ट वर प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉ. मुकेश चौधरी डॉ.तन्मय महाले, ईचार्ज सिस्टर योगिता बडगुजर, ग्रामीण रुग्णालय कार्यालयीन अधीक्षक पंकज पाटील,समूहउपदेशक अंकुश थोरात, प्र.शा. त. उमेश फुलपगारे, दीपक पोहेकर, औषध निर्माता तुषार राजपूत, किशोर चौधरी, प्रतिभा चौधरी, सुरेखा निकम, चेतन गुरव, प्रकाश माळी, डॉ. तेजल वानखेडे, सचिन ठोंबरे, राजेंद्र पाटील अरुण चौधरी सह ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ :- ग्रामीण रुग्णालयात एडस् दिनानिमित्त उपस्थित डॉ. कैलास पाटील, डॉ. तन्मय महाले, अंकुश थोरात व इतर कर्मचारी