
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर /प्रतिनिधी काशिनाथ आगलावे
०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभरात दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय अहमदपूर येथे दिव्यांग दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,गुणवंत आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दिप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी सौ. माळी मॅडम यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यायाधीश ठाकरे साहेब हे होते. न्यायाधीश ठाकरे साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना दिव्यांगाचे कायदे विषयक मार्गदर्शन केले. त्याच बरोबर न्यायाधीश ठाकरे साहेब यांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आजी माझी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना श्री मोघे सर यांनी दिव्यांगासाठीच्या विविध शासकीय योजना या विषयी माहिती दिली. त्याचबरोबर दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान व उपचार या विषयी आपल्या मुलांना लवकरात लवकर उपाययोजना कश्या प्रकारे कराव्यात व कर्णबधिर बालकांचे कौशल्य विकास तसेच समुपदेशनात्मक मार्गदर्शन पालकांना व विद्यार्थ्यांना श्री मोघे सर यांनी केले.
श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय चे मुख्याध्यापक श्री तपशाळे व्ही. यू यांनी सर्वांचे आभार मानले तसेच श्री बिरादार सर,पाटील सर,शिंदे सर,वानखेडे सर,आगलावे सर,कांबळे मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थी व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.