
दैनिक चालू वार्ता
नांदेड प्रतिनिधी (विश्वास खांडेकर)
गेल्या अनेक दिवसापासून एस टी महामंडळाचा संप चालू आहे. या संपामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आहे, संपा दरम्यान अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत, अशीच घटना आज नांदेड येथील बसस्थानकात घडली
काल सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संपाच्या पेंडॉल मध्ये संपकरी कर्मचारी बसले होते. त्यामध्ये ‘दिलीप विठ्ठलराव वीर’ वाहक नंबर 1233 ‘नांदेड आगार’ हेदेखील बसले होते .परंतु याचा पेंडाँल मध्ये त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळील इस्पितळात दाखल केले, परंतु आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला
एसटीचा हा संप अनेक दिवसापासून चालू आहे यामध्ये आणि कर्मचारी विचारात पडले आहेत की हा संप संपनार की तसाच चालू राहणार, याबाबत कोणतेही चित्र स्पष्ट होत नाहीये त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ताण तणाव वाढला आहे. याचाच परिणाम म्हणजे मृत्यू होत आहेत.
आज दुपारी त्यांचा मृतदेह नांदेडच्या बस स्थानकात आणण्यात आला होता तेथे कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, याबाबत सरकारने दखल घ्यावी अशी मागणी त्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. त्या वेळी घोषणा देखील देण्यात आल्या ‘वीरअमर रहे’ आता हा संप अजून किती लोकांना गिळंकृत करणार हे देखील आता समजत नाही.
वीर यांच्या पाठीमागे दोन मुली, दोन मुले आणि पत्नी असा फार मोठा गोतावळा उरला आहे या संपात त्यांच्या घरातील कर्ता पुरूष हारवल्याने संपूर्ण घरावर दुःखाची काळा पसरली आहे.