
दैनिक चालू वार्ता..
लोहा तालुका प्रतिनिधी..
मारुती कदम..
राज्यातील गटसचिव यांचे सेवा वेतनाचे प्रश्न सोडविण्यास शासन उदासीन असल्यामुळे राज्यभरातील सर्व गटसचिव यांचा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुक कामकाज आणि शासकीय सर्व माहिती देणे यावर बहिष्कार आणि बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 8 डिसेंबर 2021 रोजी करण्यासाठी लोहा तालुका गटसचिव सहकारी सेवक संघटना यांच्या वतीने मा.सहाय्यक निबंधक साहेब यांना निवेदन देण्यात येऊन खालील प्रमाणे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
1. राज्यातील गटसचिव यांना लोक सेवकाचा दर्जा देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे. 2.राज्यभरात समान काम समान वेतन या योजनेअंतर्गत ग्रामसेवक प्रमाणे वेतन व सेवानियम लागू करावे.
3.मयत झालेल्या सचिवांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घ्यावे आणि रिक्त गटसचिव पदांची भरती करण्यात यावी तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने नियुक्त केलेल्या सचिवाचे संवर्गीकरण यंत्रणेत समायोजन करण्यात यावे.या व इतर सर्व गट सचिवांच्या मागणी करिता सदरचे निवेदन आज दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था लोहा यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी लोहा तालुक्यातील गटसचिव जिल्हा संघटना कार्याध्यक्ष श्री संजीवकुमार के तेलंग, राजेश गुद्दे, माधव कांबळे , एन एस गोगे, अरुण भांगे, एम एन जाधव, विलास कवडे उपस्थित होते.