
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
बोरी (बु.) :- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवारी दि. ०५ डिंसेबर २०२१ ते १२ डिंसेबर २०२१ या कालावधीत भव्य भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बोरी (बु.) येथे साजरा होत आहे. तरी आपण सर्व भाविक भक्तांनी दररोजच्या होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरीकिर्तन व भागवताचार्य ह. भ. प. तुकाराम महाराज शास्त्री मुंडे परळीकर यांच्या सुश्राव्य व रसाळ वाणीने भागवत कथेचे श्रवण करावे. असे आवाहन श्री. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तूषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, आ. भीमराव केराम आदिची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहाचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे मा.खा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (कळकेकर), जि. प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, श्री. बाबुराव केंद्रे, श्री. बालाजी पाटील मारतळेकर, बोरी बु, कळका, कागणेवाडी, नांवदेवाडी, टोकवाडी, वाखरड,मंगनाळी, पेठवडज, सिरसी खु, सिरसी बु., वरवंट या सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सर्व नागरिक यांनी कळविले आहे.