
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :अनिल परब काय म्हणाले
एक महिना शासनाने खूप सहानभूतीपूर्वक धोरण घेतलं, महाराष्ट्रातील जनता आता प्रश्न विचारायला लागली आहे की एक महिना झाला संप मिटत नाहीए. आम्ही कामगारांबाबत सहानभूतीचं धोरण स्विकारलं, पगारवाढ दिली, चर्चेची दारं खुली ठेवली होती. पण केवळ एका मुद्द्यावर आडमुठेपणाचं धोरण ठेऊन लोकांना एसटीपासून परावृत्त केलं जात असेल तर सरकार हे उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या महिन्याभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांदरम्यान बैठक झाली.मुंबई सेंट्रल इथल्या एसटी मुख्यालयात बैठक पार पडली या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
मेस्मा का कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते, मेस्मा कायदा त्यांना लागू होऊ शकतो. मेस्मा लावण्यावर शासन अतिशय गंभीर आहे, त्याच्यावर विचारविनियम करतोय, मुख्यमंत्री-उपमुख्यंत्र्याची चर्चा करुन यावर निर्णय घेऊ असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
आज कुठलंही अल्टिमेटम देणार नाही, त्याचं कारण असं आहे आम्ही बऱ्याचवेळा सांगितलं की संप मागे घेतला तर कारवाई मागे घेऊ, पण आता जी कारवाई आम्ही केलेली आहे ती कारवाई आता मागे घेणार नाही. यात जे कोणी भडकवणारे सापडतील, त्यांच्यावर जी कारवाई करण्यास भाग पडेल, ती सर्व प्रकारची कारवाई करु कारण महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची आता वेळ आली आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.