
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : अमरावतीत झालेला प्रकार तर सर्वांनीच पाहिला. तो संयोग नव्हे तर प्रयोग होता’, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी अर्बन नक्षलवादावरही जोरदार प्रहार केला.
‘बंदूक हाती असणार्यांचा मुकाबला करणे सोपे आहे. पण, जे येणार्या पिढ्यांना विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण आहे आणि त्यामुळेच अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घ्यावे लागेल.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. ‘डाव्यांची विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत सु. ग. शेवडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, रवींद्र चव्हाण आणि इतरही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अमरावतीत मोठा हिंसाचार झाला. त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या. त्रिपुरात सीपीआयच्या इमारतीला आग लागली, त्याचा फोटो मशिदीच्या नावाने व्हायरल केला गेला. दिल्लीत पुस्तकं जाळती तर त्याचे फोटो कुराण जाळलं म्हणून व्हायरल केले गेले. यांची इकोस्टिस्टिम आहे. एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, अशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार होत आहेत याचं नरेटिव्ह तयार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.