
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई – आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवल्या आहेत.पुढे काय होईल सांगता येत नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो साहेब घेतील. परंतु सध्यातरी मनसेची एकला चलो रे भूमिका आहे.भाजपा-मनसे युतीबाबत सध्या चर्चा सुरु झाली नाही.लवकर जी काही चांगली बातमी यायची ती येईल असे सूतोवाच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
मनसेच्या नेत्यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं राज ठाकरे दौरा करणार आहेत. मराठवाड्यात संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र पुणे, कोकणात रत्नागिरी, विदर्भात नागपूर, अमरावती याठिकाणी दौरा होणार आहे.
सध्या १४ डिसेंबरला संभाजीनगर तर १६ डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. मुंबईत नेत्यांचा मेळावा होईल. या दौऱ्यावर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जातील असंही मनसेकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले.