जव्हार:- केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत जव्हार शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टी जव्हार शहर जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ दिव्या विद्यालय जव्हार येथे संपन्न झाला.यावेळेस आमदार संजय केळकर,आमदार रवींद्र चव्हाण,आमदार रमेश पाटील तसेच वरिष्ठ नेते बाबाजी काठोळे,जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील,प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्रजी भोये,पालघर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सुरेखाताई थेतले,महिला जिल्हाध्यक्षा ज्योती भोये,संघटन सरचिटणीस पालघर जिल्हा संतोष जनाठे,जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत,जव्हार शहर अध्यक्ष नागेश उदावंत,चेतन पारेख, उमेश नायकर,आकाश शिरसाट इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत जव्हार तालुक्यातील हेमंत गोविंद शहरातील रुपेश घाग,चेतन विश्वकर्मा,मंगेश रसाळ,डॉ.निलेश मोरे,राठोड,रुपेश मुकणे,मोईन सय्यद,कल्पेश मोरे,शुभम रसाळ, ओमकार पहाडी,सचिन बांदेकर सहित असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.