बेधुंदपणे ग्राहकाला लुटणाऱ्या फायनान्शिअल ( KOGTA FINANCE ) कंपनीवरती महाराष्ट्र शासन अथवा RBI पाव बंदी घालणार का ?
पुणे : कोगटा ( kogata Financial ) फायनान्शिअल सर्विसेस ची ग्राहका सोबत फसवेगिरी होत असल्याचे उघड झाले आहे. कोकटा फायनन्सच्या जुन्या ग्राहकांना लोन व टॉपचे आमिष दाखवून त्यांच्याकडून डोकमेंट्स घेतले जात आहेत. डोकमेंट्स दिल्यावर घराचं ऑफिसचं वेरिफिकेशन च्या नावा खाली 10 दिवसचा वेळ घालू पणा करायचा आणि पुन्हा ग्राहकांनीं फोन केला तर न उचलणे उचला तर उलट सुलट उत्तर देणे. ग्राहकांना दम पण दिला जातोय ( कस्टमर केर कडून ) ही लोक इथपर्यंतच न थांबता जुन्या ग्राहकावरती वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस टाकून कस्टमरला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सरस पणे करतात. आणि ग्राहकाने काही प्रश्न विचारला तर त्याला सरळपणे वेड्यात काढण्याचे काम ही कोगटा फायनान्स कडून केले जाते.
कोगटा फायनान्स ( kogta Finance ) कडून ग्राहकांची फसवणूक थांबणार का नाही किंवा अशा नॉन बँकिंग फायनान्स वरती महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारचा काही वाच नाही का असा प्रश्न आता सामान्य ग्राहकांना पडत आहे. जे कोफ्ता फायनान्सच्या जाळ्यात अडकत आहेत.( kogta Finance )
कोगटा फायनान्सचा उद्धट व बिनडोक स्टाफ ज्यांना बोलायचं काय हा ताळतम्य नाही ग्राहकांना कोणत्याही उद्धट भाषेमध्ये प्रतिउत्तर दिलं जातं व फोन डायरेक्ट कट केला जातो. असाच एक कडवट अनुभव दैनिक चालु वार्ताचें संपादक यांना आला आणि त्यांनी ऑनलाईन फायनान्स बद्दल माहिती घेतली किंवा इतर ग्राहकांडून माहिती घेतली असता त्यांना एकंदरीत कोगटा फायनान्स ( kogta Finance ) हे ग्राहकाची फसवणूक करत असल्याचे लक्षात आलं आणि इथून पुढे हा अनुभव किंवा कोगटा फायनान्स ( kogta Finance ) चे अधिकारी कोणाशी उद्धट पद्धतीने बोलू नये व ग्राहकाची फसवणूक होऊ नेय याकरिता त्यांनी कायदेशीर रित्या कंजूमर कोर्ट व आरबीआय ( RBI ) कडे तक्रार करण्याचे ठरवले आहे.
दैनिक चालु वार्ता चे संपादक यांना जो अनुभव आला त्याचे सर्व पुरावे त्यांनी ठेवून रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे तक्रार करून रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहेत.व अशा ( kogta Finance ) नॉन बँकिंग फायनान्स वरती पाव बंदी घालून नियम अटीमध्ये काम करायाला सांगितलं पाहिजे असं कोगटा च्या जुन्या ग्राहक्काचं मत आहे.