दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार र्दौड-9923531092
दि. ८ – ३५ – बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १९९- दौंड विधानसभा मतदारसंघा मध्ये दिनांक ८. मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’मतदार जागृती आणि मतदान सहभाग कार्यक्रम अंतर्गत तहसील कार्यालय दौंड येथे तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला दौंड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, व तहसीलदार अरुण शेलार, यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ तुषार बोरकर, यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांचीप्रभात फेरी दौंड शहरांमध्ये तसेच महिला मतदान टक्केवारी कमी असलेल्या भागांमध्ये प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती प्रभात फेरीमध्ये महिलांनी जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले त्यामध्ये ‘स्त्री शक्ती देशाची, ताकद लोकशाहीची’ यासारख्या विविध घोषवाक्य बॅनर्स याचा वापर करण्यात आला याबरोबरच दौंड शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांचे पथक नेमून महिला नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजून आपले नाव शोधण्यासाठी ( QR CODE )ची माहिती देण्यात आली यावेळी दौंड तालुक्याचे महिला व बालविकास अधिकारी कुणाल धुमाळ, दौंड शहराचे मंडळ अधिकारी धनंजय गाडेकर,दौंड शहराचे तलाठी संतोष इडोळे,श्रीमती वर्षाराणी दळवी, मंडळाधिकारी कुरकूभ तसेच तालुक्यातील महिला विभाग विकास विभागाच्या सर्व पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका याचं सहभाग होता.