इंदापूर तालुका काॅंग्रेस उद्यापासून प्रचाराची सुरुवात करणार…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):आज इंदापूर विश्रामगृह येथे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीची आगामी लोकसभा निवडणूक तसेच पक्ष संघटनेच्या ३२९ बुथ कमिटी तसेच बी.एल.ओ कार्यकरत्यांच्या नोंदणीबाबत जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक नंदूकाका जगताप व बारामती लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे समन्वयक लहूआण्णा निवंगुणे यांच्या उपस्थितीत बैठक होवून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बासमती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक लहूआण्णा निवंगुणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सक्रीय पणे कार्यकत्यांनी सहभाग घेवून सुप्रिया सुळे यांना अधिकाधिक मतदान करणेच्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर जिल्हा निरीक्षक नंदूकाका जगताप यांनी २०० इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या बुथ कमिटी पदाधिकारी
B.L.O व मंडल कमिटीच्या कार्यकत्यांच्या नेमणूकीचा आढावा घेवून प्रचाराच्या कामात कार्यकर्यांनी आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर , तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग,काका देवकर, चमन भाई बागवान, राहूल आचरे, युवराज मामा पोळ, बापूसाहेब बोराटे,युवराज गायकवाड,जाकीर काझी,निवास शेळके, युवकचे सुफियान जमादार, गोविंद कटकदौंड, धनंजय गलांडे, सम्राट पोळ,बारामती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर व इंदापूर तालुक्यातील काॅंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थत होते.