दै.चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
छत्रपती संभाजीनगर- १० वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक आहे, ही गोष्ट मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमी सांगितले आहे. मी ते लपवून ठेवले नाही. पण मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, मी केवळ नेतृत्वाकडे हट्ट केला, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना म्हणाले की, संभाजीनगरमधून कोण लढणार हे अजून पक्षाने स्पष्ट केले नाही. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलून काम करत असतात पण मी त्यांच्याकडे बघून नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून काम करतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी आम्ही काम करू, चंद्रकांत खैरे यांनी ही निवडणूक सुद्धा माझ्यामुळे हरले असे म्हणू नये असे त्यांनी म्हटल्याने चर्चांना उधाण आले आहे. चर्चांना पूर्णविराम देण्यास अंबादास दानवे म्हणाले की, मी शिंदे गटात जाणार नाही, हा गट २ ते ४ महिन्यासाठी आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.