दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव भूम:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत काम पाहत आहेत.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा वाढदिवस निमित्त राज्य भरात या निमित्त वेगवेगळे उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.पालकमंत्री सावंत यांनी आरोग्य मंत्री म्हणून कार्यभार घेतल्यापासून आरोग्य विभागात नवनव्या संकल्पना राबविण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भूम येथे विधवा व निराधार गरजू महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आली तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप हा सामाजिक उपक्रम माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगीताताई गाढवे यांच्या वतीने राबवण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,मा.नगराध्यक्षा संयोगीताताई गाढवे,रामकीसन गव्हाणे, दिलीप तेलंग,दत्ता गायकवाड,सूरज गाढवे, संजय साबळे, बालाजी अंधारे, बालाजी माळी, मामू जमादार, अमोल गायकवाड,सुनील थोरात आदी उपस्थित होते.