दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-२१ मार्च रोजी सकाळी ०६:०८:३० वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रावर दिसुन आली. हिंगोली जिल्हातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ०६:१९:०५ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रावर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आलेले आहे. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे.
यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्हातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले.
श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी माहिती दिली आहे.