दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर खुर्द संचलित संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथे गेली ३३ वर्षे अविरत सेवेत असणारे सेवाभावी वृत्तीचे ,अभ्यासू ,कष्टाळू विद्यार्थीप्रिय ,शिक्षकप्रिय ,मनमिळावू म्हणून सर्वांना परिचित असणारे श्री सुधाकर श्यामराव इंदूरकर शिपाई पदावरून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा दिनांक १०/०४/२०२४ रोज बुधवारी दुपारी १२ वाजता संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर ता. लोहा जि. नांदेड येथे संस्थेच्या सचिव श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड व संस्थेचे अध्यक्ष श्री मारुतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या उपस्थितीत सेवापुर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे सुधाकर इंदुरकर हे वयोमानानुसार ३१/०३/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.त्यामुळे त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा दिनांक १० एप्रिल २०२४ बुधवार रोजी आयोजित केला आहे. सत्कार सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष मारुतीराव पाटील घोरबांड साहेब, मुख्याध्यापक एस एन मामडे साहेब ,मुअ.एम.बी.भोपाळे ( कै बळीराम पाटील प्राथमिक शाळा भोपाळवाडी) व सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका,शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थीनी, विद्यार्थी यांनी आयोजन केले आहे.