जिल्ह्यातील सर्वात मोठा समाजपयोगी उपक्रम ; नागरिकांना दिलासा…
धाराशिव:-भूम परांडा वाशी तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची मोफत ऑपरेशन करणारे भूमिपुत्र डॉ. राहुल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ११ रोजी लाखो नागरिकांची घरोघरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. देशभरात वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य सेवा देऊन जन्मभूमीचे ऋण फेडणारे भूमिपुत्र डॉ. राहुल घुले हे गेल्या एक वर्षापासून माय भूमितील नागरिकांची मोफत ऑपरेशन सह उपचार करत आहेत. त्यांची आरोग्य विषयक व सामाजिक चळवळ जिल्ह्यात जोरात चालू आहे. ते कमीत कमी दरामध्ये आरोग्यसेवा देत आहेत . त्यांनी शाळा, महाविद्यालये, संस्था, नागरिकांना जागेवरच उपचार करता यावा यासाठी सुमारे ५० हजारांच्या वरती प्रथमोपचार पेटी भूम परंडा वाशी सह जिल्ह्यात भेट म्हणून दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असली जाणारी डीपी दुरुस्तीची समस्या यासाठीही त्यांनी मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर लग्नकार्य, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम यासाठी लागणारे मंगल सेवा मोफत उपलब्ध करून दिले आहेत. गरीब कुटुंबासह सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. डॉ. राहुल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त दि११ एप्रिल रोजीपासून त्या भूम परांडा वाशी तालुक्यातील १ लाख जेष्ठ नागरिकांची घरोघरी जाऊन मोफत रक्तदाब तपासणी योजनेचा शुभारंभ होत आहे . भविष्यात होणाऱ्या हृदयविकार, अर्धांगवायू यासारख्या गंभीर आजारापासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्व नागरिकांनी आपली मोफत रक्तदाब तपासणी करून घ्यावी असे डॉ. राहुल घुले व डॉ राहुल घुले आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.