दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा : कलंबर खुर्द येथील कै. जिजाबाई बळीराम पाटील घोरबांड व कै. निवृत्तीराव बळीराम पाटील घोरबांड यांच्या पुण्यतिथी निमित्त मुळव्याध फिशर व भगंदर इत्यादी गुद्दमार्गाच्या आजारावर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा रुग्णाची तपासणी निवघेकर आयुर्वेद हॉस्पिटल डॉ.मापारी यांच्या समोर डॉक्टर लाईन नांदेड येथील तज्ञ डॉ. विश्वाभंर पवार निवघेकर (मुळव्याध व आयुर्वेद तज्ज्ञ) व डॉ. सुरेखा पवार
(घोरबांड) निवघेकर (मुळव्याध व गर्भसंस्कार तज्ञ) दिनांक १४/०४/२०२४ वार रविवार वेळ सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.शिबीराचे ठिकाण धन्वंतरी हॉस्पिटल नांदेड कंधार हायवे कलंबर खुर्द रोड भोपळवाडी फाटा ता.लोहा जि. नांदेड येथे आयोजित केले आहे.शिबिरातील रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता भासल्यास ५०% टक्के दराने इंजेक्शन/ लेझर /क्षारसुत्राव्दारे ऑपरेशन केले जाईल नाव नोंदणीसाठी ८८०६००३४०७, ९९२१४९१७५६ या नंबर वर फोन करून नावनोंदणी करू शकता व मुळव्याध, फिशर व भगंदर तसेच गुद्दमार्गाच्या आजारावर मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ घेवू शकता असे कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड यांचे जावई डॉ विश्वाभंर पवार निवघेकर साहेब व कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड यांची कन्या डॉ सुरेखा पवार निवघेकर , श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड, श्री.मारोतराव निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांनी मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.