दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर): बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये सर्व सामान्य जनतेचा कौल हा सुप्रियाताई सुळे यांच्या बाजुने असून ,आता जनतेने ठरवलं काहीही झाले तरी सुप्रियाताई सुळे याच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारूद्र पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी हे संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व सामान्य जनतेपर्यंत जाऊन आजपर्यंत शरदचंद्र पवार व सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या कार्य अहवाल देत आहेत.या मध्ये प्रामुख्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील,जेष्ठ नेते अशोक घोगरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर, आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना इतर सर्व घटक पक्ष यांचे नेते सक्रिय सहभागी झाले आहेत.