महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराकरिता ग्राम मलठण वस्ती, सोनवाडी नाथनगर तांडा, चौफुला या गावांमध्ये कोपरा सभा आयोजित केल्या होत्या. सदर प्रचारांमध्ये वाशिम जिल्ह्यातील प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव नाईक, राजू अवताडे, मनोज कानकिरड, रमेश जाधव मुंबई तसेच बारामती मतदारसंघातील भटक्या जमातीचे कार्यकर्ते संदीप शिंदे, सुनील मोहिते, रोहित लोंढे, बापू पवार हे सहभागी होते. गावकऱ्यांना महाविकास आघाडीचा विकासात्मक निवडणूक जाहीरनामा समजावून सांगण्यात आला. तसेच बारामतीचे नाव श्री शरदचंद्र पवार साहेबांनी संपूर्ण भारतात व परदेशात रोशन केले. बारामती म्हणजे शरद पवार यामुळे येथील मतदार साहेबांना कधीही नाराज करू शकत नाही, सुप्रियाताईच निवडून येणार अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. तसेच मा.सुप्रियाताई या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्या असून महाराष्ट्र व देशातील शेतकऱ्यांचे व इतर प्रश्न मांडणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव संसद पटू असल्याने मा. सुप्रियाताई सुळे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दुपारी ०४.०० वाजता वरवंड येथील मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या भव्य प्रचार सभेमध्ये सर्व सहभागी झाले…
Related Stories
7 days ago