
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
विधानपरिषदेत बिनविरोध बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या गटात सतेज पाटील यांच्यासोबत डमी म्हणून दोन अर्ज भरले आहेत, त्यांचे अर्ज मागे घेण्याची औपचारिकता बाकी आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता यांच्याविरोधात फॉर्म कोणीही भरला नाही त्यामुळे ते बिनविरोध होतील जिल्हा बँकेच्या राजकारणात सध्या प्रचंड चुरस सुरु आहे. पालक मंत्री बरोबरच माननीय मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री विनय कोरे तसेच मंत्री राजेंद्र पाटील असे अनेक संचालकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच ठरावधारक आपल्या बाजुने वळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.