
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम:- बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद यांच्या कडून देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवन गौरव वाचन-लेखन चळवळ पुरस्कार श्री बाळासाहेब निकाळजे यांना जाहिर करण्यात आला आहे. श्री बाळासाहेब निकाळजे हे मूळ भूमचे रहिवासी असून सध्या साईबाबा विद्यालय स्वराजनगर औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . बाळासाहेब निकाळजे जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक तसेच गुरुमाऊली चारोळी कट्टा या साहित्य विषयक राज्यस्तरीय ग्रुपचे अध्यक्ष असून कवी म्हणून ओळखले जातात. चित्रावरून आणि विषयानुसार चारोळी लेखन, काव्य लेखन स्पर्धा तसेच विविध प्रासंगिक उपक्रम आणि साहित्य विषयक स्पर्धांचे गेल्या ५ वर्षापासून सातत्याने आयोजन करण्याचे काम गुरुमाऊली चारोळी कट्टाच्या माध्यमातून केले जाते. गुरुमाऊली चारोळी कट्टा आणि जीवन गौरव मासिकाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात बाळासाहेब निकाळजे हे नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन कडून पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जानेवारी २०२२ मध्ये औरंगाबाद येथे भव्य अशा कार्यक्रमात पुरस्कार वितरण केले जाणार आहे. राज्यस्तरीय जीवन गौरव वाचन लेखन पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबूरावजी पवार, संस्थेचे अध्यक्ष श्री भरतमामा राठोड, सचिव राजेंद्र जाधव, युवक नेते राकेश पवार, मुख्याध्यापक एच डी राठोड, तथागत सेवा संघाचे अध्यक्ष प्रदिप निकाळजे, सचिव प्रविण वाघमारे, नवनाथ सोनवणे,सुनिल सोनवणे,रोहित चंदनशिवे,अतुल चंदनशिवे,सम्राट निकाळजे,राजरत्न वाघमारे,यांनी बाळासाहेब निकाळजे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.