
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
प्रत्येक जीवाला जगण्याची तिवृ इच्छा असते . जगण्यासाठी प्रत्येक सजीव सतत धडपड करत असतो . सतत धावत असतो . जगण्यासाठी तो सतत पळत असतो . आता थोड्या वेळाने काय होईल ?उद्या काय होईल ? उद्या आपण राहू का नाही? याचा विचार आपण कोणीही करत नाही . या जीवन जगण्याच्या धडपडीत मानव प्राणी सर्वात वरच्या जागी आहे . मानव जरी प्राणी असला तरी तो स्वतःला सर्व प्राण्यात हुशार , बुद्धीमान ,शक्तीमान समजतो . याच महत्वाचं कारण म्हणजे मानवाचं डोकं त्याच्या पोटापेक्षा वरच्या बाजूला पोटापेक्षा उंच आहे . म्हणून तो जेवण्या पेक्षा “खाण्या “चाच विचार जास्त करत असतो .इतर प्राणीजन्य वर्गाचं पोट आणि डोकं हे जवळपास एकाच रेषेत असते त्यामुळे इतर प्राणी फक्त पोटापुरतंच विचार करत असावे भविष्याचं फारसं विचार करताना दिसत नाही. मुंगी सारखे काही प्राणी भविष्याचा विचार करताना दिसून येतात .इतर प्राण्यापेक्षा मानवाच्या मेंदूचा विकास अधिक झालेला आहे . त्यामुळे तो पोटापुरता विचार न करता इतर अनेक गुंतागुंतीच्या गोष्टीत उगीच स्वतःला गुंतत जातो . स्वतःला गुंतून घेतो .
मानवाला सुखाचे व सुख शोधण्याचे आनेक मार्ग आहेत . सुख कुठल्याही एक गोष्टीत लपून बसलेले नाही . निसर्गातील प्रत्येक दृष्य व अदृश्य वस्तूत , गोष्टीत सुख लपलेले आहे . थोडक्यात सुख तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीत लपलेले आहे . त्याचा शोध मात्र कोणीही घेताना दिसत नाही . ते शोधण्याचा कोणीही फारसा प्रयत्न करताना दिसत नाही . सर्वात बुद्धीमान समजलाणारा प्राणी म्हणजे मानव हा सुख शोधतो ते पैशात . पैशाशिवाय मानव जातीला दुसऱ्या कशात ही सुख मिळणार नाही असे वाटत असेल नाही का ? त्यासाठी तो पैशाच्या मागे सुसाट वेगाने धावतो आहे नातेगोते विसरून .
प्रत्येकजण जीवनातील सुख प्राप्तीसाठी पैशाच्यामागे लागलेला आहे .पैसा पुढे पळतोय तर मानव त्याच्या पाठीमागे सारखं पळतोय . पैसाही मोठा हुशार आहे तो फक्त श्रीमंताला हेरतो आहे .तो हेरतो आहे समाजातील गुंड भ्रष्टाचारी लोकांना. त्याचं स्थळ शोधताना तो श्रीमंताच्या घरी दिर्घकाळ विश्रांती घेत आहे . तर काहींच्या हाती थोड्या काळासाठी लागत आहे . पैसा कोण्याच्या खिशात , कोणाच्या बॅगमध्ये ,कोणाच्या तिजोरीत ,तर कोणाच्या आलमारीत दडी मारून बसत आहे . बोटावर मोजण्या इतक्या लोकाजवळचं पैसा आहे .यामुळे “आहीरे ” पेक्षा “नाहीरे “ची संख्या समाजात भरमसाठ वाढत आहे . विषमतेची दरी भयान बनत आहे .
पैशाच्या सहवासात सर्वजण सुख शोधत असल्यामुळे समाजात जवळच्या नात्यातही प्रचंड खोल खोल दरी निर्माण झाली आहे . या पैशापुढे ना बाप मोठा , ना आई मोठी . पैशासाठी आई स्वतःच्या काळजाच्या तुकडयावर कु-हाडीचे घाव घालून ठार करण्यास मागे पुढे पाहेनासी झालेली आहे . मुलगा आई बापावर पैशासाठी घाला घालतो आहे . नरड्याचं घोट घेण्यासाठी तो तयार आहे . सखाभाऊ सख्याभावाचा खून करतो आहे . सखीबहीन सख्याभावाची वैरीन बनत आहे . हे सर्व पवित्र नाते पैशाच्यापुढे फिके पडलेले आहे , नव्हे नाते संपुष्टात येत आहेत. समाजात एकच नारा दिसतोय ” हमको पैसा प्यारा पैसा है ! सबसे बडा रुपया. है !”
पैशापुढे जसे नाते आपण जपत नाही तसेच राजकारणी राजकारणात ही नैतीकतेची चाड ठेवताना दिसत नाही . राजकारणी पैशाचा पाऊस पडतो आहे . निवडणूक जिंकतो आहे . भ्रष्टाचार हा राजकारणात समाजकारात शिष्टाचार म्हणून मोठ्या दिमाखात वावरत आहे . या भ्रष्ट शिष्टाच्यारातून समाजाची सूटका होताना दिसत नाही . सुटका होणार ही नाही . यास समाजातील काही लोकही जबाबदार आहेत . छोटसं काम घेवून तुम्ही कोणत्याही कार्यालयांत गेलो तर तेथील शिपायापासून आपल्या खिशाच्या ताकदीची विचारपुस होते . खिशात असेल तर पुढे जा . नाही तर परत फिरा गुमानं . मारा चकरा . साहेबाला वेळ नाही .असे समोरुन सुनावले जाते . तुम्ही कोठेही जा “दाम करी काम” हेच सूत्र सर्वत्र वास करून आहे . आपण जीवनात पैशाला अति महत्व दिल्यामुळे वैयक्तिक , कौटुम्बिक व सामाजिक स्वास्थ पार बिघडून गेली आहे . लयाला जात आहे . जवळपास सर्व पापाचा बाप पैसा झालेला आहे .
कुठे तरी कधी तरी माझ्या वाचनात एक कथा आलेली होती ती कथा मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगतो आहे :
एकदा धर्मराज ( युद्धीष्ठीर ) सकाळी सकाळी कोवळं उन्ह खात राजवाड्याच्या अंगणात बसलेले होते.कोवळं ऊन पसरलेलं होतं.प्रसन्न वातावरणात महाराज धर्मराज बसलेले होते . प्रसन्न चेहऱ्याने इकडे तिकडे आनंदाने पहात होते .तेवढ्यात एक याचक (भिकारी) राजा समोर येवून थांबला व महाराजाला म्हणाला , ” महाराज या गरिबाला काहीतरी दान करा की .” युद्धीष्ठीर याचकाला कधीच विन्मुख पाठवत नसत . पण त्यावेळी त्यांच्या जवळ एका फुटकी कवडी शिवाय दुसरं काहीही देण्यासारखं नव्हतं . त्यांनी माझ्या कडे आता देण्यासारखे काहीही नाही ,आता मी तुला काहीही देवू शकत नाही असे ते त्याला म्हणू शकत नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या जवळची ती कवडी त्या याचकाला दिली . तो याचक एक भोई होता . तो कवडी विकून एक मासेमारीचं जाळं विकत घेतलं. पुढे चालून त्या भोयाने त्या जाळ्याने भरपूर मच्छीमारीचा व्यवसाय केला . व्यवसायात त्याची खूपच भरभराट झाली . तो आनंदाने जीवन जगू लागला . खूपच मच्छेमारी करू लागला .
इकडे पांडवांचा जीवन काळ संपला . एक एक पांडव मृत्यूला कवटाळत गेले. धर्मराज मात्र त्यांच्या कुत्र्या सहित स्वर्गात गेले . स्वर्गात जात असताना धर्मराजाचे विमान नरकाजवळून नेण्यात आले . नरकाचा घाण वास धर्मराजाला अनुभवता आला व त्याच वेळी त्यांच्या डाव्या पायांचा अंगठा ही तुटून गळून पडला . जेव्हा धर्मराज स्वर्गात गेले तेव्हा त्यांनी यमाला विचारले , “महाराज , मी जीवनभर पुण्याचं काम केलो . लबाड कधी बोललो नाही . कधी चहाडी चुगली केली नाही . कोणाचं वाईट चिंतलो नाही . कोणावर अन्याय केलो नाही . कोणाला वाईट , दुष्ट संबोधलो नाही तरी माझं विमान नरकाजवळून का आणलं गेलं? माझ्या डाव्या पायाचा अंगठा का झडला ? “तेव्हा यमराजाने सांगितले ,” धर्मराज , तू एकदा एका माणसाला एक कवडी दान केला होतास . आठवते का ? त्या माणसने ती कवडी विकून त्याने एक मासे मारण्यासाठी जाळं विकत घेतलं व त्या जाळ्यानं त्याने असंख्य मासे मारले . त्या माशाचे जीव घेण्यास ती कवडी ( पैसा ) कारणीभूत ठरली म्हणजे त्यास तूच कारणीभूत आहेस . म्हणूनचं त्या पापाचे प्रायश्चित तुला भोगायला लागले आहे . त्याने केलेला पापाचा बाप तो पैसा (कवडी) आहे म्हणूनच जे तुझ्यासोबत घडलं याचं कारण कळालं का आता .”
पृथ्वीतलावर आज ही पापाचा बाप पैसाच आहे. ” आजही पैशाचा वादातून , लोभातून खून होत आहेत . दरोड्याच्या घटना घडत आहेत . भृष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे . नाते दुरावत आहे .राजकारणी लोक लोकांना विकत घेत आहेत .पैशासाठी मारामारी होत आहेत . नात्यांचा पालापाचोळा होत आहे .आजही चोहीकडे पापाचा बाप पैसा आहे . या पापचं थैमान घरात , गावात , राज्यात देशात चालू आहे . सगळीकडेचं पेशाचीच चलती आहे . येथे कोणीही पैशाशिवाय निसर्गातील गोष्टीतून समाधान मिळते , सुख मिळते हा विचार करताना दिसत नाही .
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४०७ .