
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
सरकारने केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल 26 महिन्यांनंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून आता विना लायसन्स वाहन चालवणाऱ्याना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसेच हेल्मेट न घातल्यास वाहन चालवणाऱ्याचे लायसन्सच देखील रद्द होणार आहे..
जाणून घ्या नवीन कायद्यातील दंडाच्या तरतुदी
सीटबेल्ट लावला नसल्यास यापूर्वी 200 रूपये दंड तर आता 1000 रूपये भरावा लागणार._
हेल्मेट नसल्यास आधी 200 तर आता 1000 रूपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स देखील रद्द होणार._
परवाना रद्द असूनही वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद केली आहे._
भरधाव गाडी चालवल्यास 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील._
वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास 5 ते 10 हजार रुपये दंड किंवा 6-12 महिने तुरुंगवास_
_मोठमोठ्याने हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रूपयांचा दुसऱ्यांदा 2 हजारांचा दंड तसेच चालकाचे देखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे._
वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास_
वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड तसेच हाच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास दरवेळी 1500 रुपयांचा दंड भरावा लागणार._
वेगमर्यादेचे उल्लघंन केल्यास दुचाकींसाठी एक हजार रुपये, ट्रॅक्टरसाठी दीड हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी दोन हजार दंडाची तरतूद._
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवल्यास एक हजार ते पाच हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील._
रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील._
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील