
दैनिक चालु वार्ता
जळगाव जिल्हा वृत्तसेवा
भानुदास पवार
मुक्ताईनगर– तालुक्यातील मौजे सुळे व मौजे रिगांव येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हस्ते भारतीय जनता पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच यावेळी मौजे सुळे व मौजे रिगांव यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी डॉ. राजेंद्र फडके व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्ते व नागरिकांना पक्षाचा इतिहास व ध्येय धोरणा विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले, तर खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मोदी सरकारने गोर-गरीब जनतेसाठी आणलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, डॉ. राजेंद्रजी फडके व श्री. अशोक कांडेलकर यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांतभाऊ महाजन, जिल्हा सरचिटणीस संतोषजी खोरखेडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांतभाऊ भोलाने, विनोदभाऊ पाटील, प.स. सदस्य राजेंद्र भाऊ सवळे, भाजपा अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष झनके, कुऱ्हा शहराध्यक्ष रवी राजपूत, भागवत शेठ राठोड, समाधान इंगळे, साहेबराव पाटील, तालुका सरचिटणीस विशाल झालटे यांच्यासह नवनिर्वाचित भाजपा शाखा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.