
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम:-सरपंच परीषद च्या उस्मानाबाद प्रसिद्धी प्रमुख पदी आतिक शेख सरपंच शेखापुर यांची नियुक्ती करण्यात आली. मा.जितेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भुम येथे सरपंच परीषद मेळावा संपन्न झाला असुन यामध्ये विविध निवड करण्यात आली. व तसेच विविध योजना ग्रामपंचायत मधे कशा राबवणे याबद्दल मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उद्योजक प्रविण रणबागुल, जिनत सय्यद महीला प्रदेश अध्यक्ष, सुजित हंगरगेकर जिल्हा अध्यक्ष, रमेश कोकाटे, सतिश सोन्ने मराठवाडा अध्यक्ष , दिपस्तंभ ट्रस्ट पुणे अमेय जोशी, पोखरा चे प्रविण लवांडे आदि उपस्थित होते.