
दैनिक चालू वार्ता
एरंडोल प्रतिनिधी
प्रमोद चौधरी
एरंडोल:-एरंडोल शहरासह संपूर्ण तालुक्यात शांतता सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षी नथू बापू यांचे समाधीवर पोलीस प्रशासनातर्फे चादर चढविण्यात आली.
पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस निरीक्षक तुषार देवरे पीएसआय अविनाश दहिफळे यांच्या तर्फे पूजन करून वाजत गाजत नथू बापू यांच्या समाधीवर चादर चढवण्यात आली व शिरणी चे वाटप करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उर्स कमिटीचे सचिव जावेद मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पंकज पाटील, विलास पाटील, सुभाष चौधरी, रवींद्र सपकाळे, अकील मुजावर, प्रशांत पाटील, विकास खैरनार, रवींद्र वाघ, राजेश पाटील सुनील लोहार यांचेसह अनेक पोलिस कर्मचारी व शहरातील शांतता कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.