
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी एरंडोल
प्रमोद चौधरी
एरंडोल– देशभरातील लाखो हिंदू व मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर नथ्थू बापू मियां यांच्या समाधीवर पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने मानाची भगवी चादर चढवण्यात आली.
यावर्षी कोरोनाच्या तिसरी लाट येण्याच्या शक्यते मुळे व ओमीक्रोन या नव्या कोरोनाच्या विषाणू मुळे प्रांताधिकारी कार्यालयातर्फे नथ्थू बापू मियां यांचा उरूस व संदल व मेहदी यास परवानगी देण्यात आली होती व कव्वाली व कुस्त्या यांची परवानगी नाकारण्यात आली होती.दरवर्षी २९ नोव्हेंबर पासून उरुसाला प्रारंभ होत असतो.उरुसात सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होत असते.उरुसात विविध प्रकारची दुकाने व्यावसायिक सुरु करीत असतात.तसेच उंच पाळणे,मौत का कुआ,लहान मुलांसाठी विविध करमणुकीची साधने याठिकाणी येत असतात. परंतु या वर्षी सालाबादप्रमाणे लहान मोठे दुकानदार,पाळणे व्यवसाहिक आले त्यांनी पाळणे लहान मुलांचे खेळण्याच्या वस्तू उर्स साठी आले परंतु सुरू झाले नाही लहान मोठे व्यवसाय करणार्यांनी परवानगी नसल्यामुळे आपले दुकाने लावली नाही.
ज्या ठिकाणी हे दुकानदार आपली दुकाने लावतात तो रस्त्या नगरपालिका ने नवीन बनविण्यासाठी खोदला आहे त्यामुळे त्यांना दुकाने लावण्यासाठी दुसरी जागा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली नाही.
दि.2 डिसेंबर पर्यंत व्यापारी व एरंडोल तालुक्यातील व
देशभरातून हजारो भाविक संभ्रमात आहेत उर्स भरेल की नाही. उर्स भरला नाही म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी दिसून येत होती.
दरवर्षी नथ्थू बापू मियां यांचेकडे नवसाची फेड करण्यासाठी एरंडोल शहरात येतात. यावर्षी या भाविकांची संख्या कमी प्रमाणात आली.
दरवर्षी पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने उरुसानिमित्त नथ्थूबापू यांच्या दर्ग्यावर (समाधीवर) मानाची भगवी चादर भव्य मिरवणूक काढून चढवण्यात येते. पांडव वाडा येथून ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत व फटाक्यांच्या आतषबाजीने या भगवी चादर ची मिरवणूक काढण्यात आली. कोरणा महामार्गामुळे गेल्या दोन वर्षापासून युवकांना लेझीम खेळता येत नसल्यामुळे यावर्षी शहरातील युवक मोठ्या उत्साहात व आनंदाच्या भरात लेझीम खेळत या भगव्याचा चादरची मिरवणूक काढण्यात आली. पांडव वाडा मारवाडी गल्ली भगवा चौक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व बुधवार दरवाजा परिसरात असलेले नथ्थु बापू यांचे समाधी स्थळावर शहरातील पांडव नगरी उत्सव समितीचे कार्यकर्ते जमले होते. व सर्वांच्या साक्षीने समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन मनसेचे माजी तालुकाप्रमुख गोरख चौधरी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी या मान्यवरांनी नथ्थु बापू यांच्या समाधीवर भगवी चादर चढवली युवकांत तर्फे नथू बापु की जय असा जयघोष करण्यात आला.
यावेळी भोला पवार, दिनेश महाजन,जितेंद्र महाजन,अमोल भावसार,कुणाल पाटील,विशाल चौधरी,तुषार सोनार,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन,भूषण चौधरी,मोंटी महाजन,योगेश महाजन,रोहित भोई,अमोल भोई,सिद्धांत परदेशी,पावन साळी,ऋषिकेश वाणी,प्रकाश पाटील किरण लोहार, मयूर बिर्ला, सिद्धार्थ परदेशी, अतुल बोरसे यांचेसह पदाधिकारी,हिंदू व मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळी-एरंडोल येथे नथ्थू बापू मियांच्या दर्ग्यावर भगवी चादर चढवताना समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, राजेंद्र चौधरी किशोर निंबाळकर व पांडव नगरी उत्सव समितीचे कार्यकर्ते
————————————————————