
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी एरंडोल
प्रमोद चौधरी
एरंडोल :- येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्यासह वाढदिवस असलेल्या जेष्ठ नागरिक संघाचे सभासद व नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला.संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी अध्यक्षस्थानी होते
या वेळी माजी आमदार महेंद्रसिह पाटील यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढले असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी आनंदी राहावे तसेच स्वतःला कामात गुंतवून घ्यावे, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात काम करण्याचा त्यांनी अशिक्षित नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना उमेदीच्या काळात परिवारातील सदस्यांसाठी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विरोधी
अनुभव असल्यामुळेपक्षाचा लोकप्रतिनिधी असताना देखील मतदारसंघातील एसटी डेपो, अंजनी प्रकल्प, भालगाव तलाव, पद्मालय तलाव यासारखी अनेक विकासाची कामे केल्यामुळे मानसिक आनंद मिळत असल्याचे सांगितले. अंजनी प्रकल्पामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून, मतदार संघातील नागरिक माझ्या कारकिर्दीत झालेल्या कामांची चर्चा करीत आहेत हीच माझ्या कामाची पावती असल्याचे सांगितले. या वेळी प्रा. शिवाजीराव अहिरराव, निवृत्त मुख्याध्यापिका शालिनी कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रसिध्द कवी वा ना आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माजी आमदार महेंद्रसिंह पाटील हे सामान्यांचे अश्रू पुसणारा माणूस आहे. सर्वसामान्य मतदार आपल्या परिवारातील सदस्य समजून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम माजी आमदार महेंद्रसीन पाटील यांनी केल्याचे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. अंजनी प्रकल्पाचे शिल्पकार, एसटी डेपोचे निर्माते, तसेच अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मतदारसंघात आणणारे म्हणून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांची ओळख कायमस्वरूपी राहील, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
कवी निंबा बडगुजर, नामदेव पाटील यांनी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्यावर आधारित सादर केलेल्या कवितेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संघाच्या नवीन सभासदांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांनी संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कवी विलास मोरे यांनी सूत्रसंचलन केले. संघाचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष जाधवराव जगताप, पी. जी. चौधरी, गुलाबराव पवार, रमेश महाजन, माजी नगराध्यक्षा आशा महाजन, युवा उद्योजक पंकज काबरे, नरेंद्र पाटील, बापूसाहेब निकम, विलास भोसले, प्रा. एस. पी. पाटील, डॉ. पी. जी. पिंगळे, सुपडू भांडारकर, गणेश महाजन, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, मधुकर सूर्यवंशी, भगवान महाजन यांच्यासह सभासद व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ :- सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सत्कारप्रसंगी उपस्थित मा आ महेंद्रसिह पाटील,अरुण माळी व इतर मान्यवर