
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनिधी
भूम:- श्री संत सेना महाराज युवा बचत गटाची चौथी वार्षिक मीटिंग भूम विश्राम गृह येथे भूम नगर परिषद गट नेते श्री संजय नाना गाढवे व गटाचे अध्यक्ष तथा भूम ता .नाभिक संघटना तालुकाध्यक्ष श्री दादासाहेब चंद्रकांत राऊत यांच्या उपस्थित झाली . बचत गटाच्या सर्व सदस्यांना गटाचे अध्यक्ष दादासाहेब राऊत यांनी मार्गदर्शन केले व चार वर्षाचा गटाचा अहवाल सादर केला .प्रमुख पाहुणे न .प गट नेते आदरणीय श्री संजय नाना गाढवे यांच्या हस्ते बचत गटाच्या सर्व सदस्यांना सलून उपोयोगी साहित्य व बचत गटाच्या चौथ्या वार्षिक अहवालाच्या प्रति देण्यात आल्या.या वेळी बचत गटाचे सदस्य दत्तात्रय शिंदे,विकास यादव, बाळासाहेब चौधरी, संजय चौधरी, रमेश राऊत, संभाजी चौधरी, दिगंबर सांगळे, आस्रु चौधरी ,बाबुराव पंडित,अक्षय चौधरी, धनराज चौधरी ,विक्रम सांगळे या वेळी उपस्थित होते .