
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर – प्रतिनिधी
पूर्व श्रमिचे मुरली कर्मचारी व पूर्व मुरली कंत्राटी कामगार यांना दालमिया सिमेंट प्रकल्पात (नारंडा) सामावुन घ्यावे कामगारांना सिमेंट वेज बोर्ड नुसार वेतन मिळावे तसेच पूर्वश्रमिचे पॅकींग प्लॉट कामगारांना रोजगार मिळावा, दत्तक गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे “महाधरणे आंदोलन” दि. १०/११/२०२१ पासुन सुरू आहे. आज महाधरणे आंदोलनाचा २५ वा दिवस आहे. जिल्हा प्रशासनाने, दालमिया प्रशासनाने आंदोलकांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने मध्यंतरी सात कामगारांनी दि २३/११/२०२१ पासून अन्नत्याग आंदोलन देखील केले. अन्नत्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी सात पैकी पाच कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पोलीस प्रशासनाने बळजबरीने दि. २९/११/२०२१ ला अन्नत्याग करणाऱ्या आंदोलकांना उचलून जिल्हा रूग्णालय चंद्रपुर येथे उपचारार्थ दाखल केले तरी देखील जिल्हा प्रशासनाने व दालमिया प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यांच्या पश्चात कामगारांच्या पत्नीने देखील अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे तरी देखील कंपनी प्रशासनाचे एच आर उमेश कोल्हटकर व सिनियर मॅनेजर पराग पानपट्टीवार याचा मनमानी तुघलकी कारभार सुरूच आहे. आंदोलनकर्त्या पूर्व मुरली कर्मचारी व कंत्राटी कामगारांना तसेच पॅकींग प्लाट कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आमदार खासदार देखिल उदासिन आहेत “ महाधरणे आंदोलनाला” कामगारांचा व दत्तक गावातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पांठिबा देखील आहे.
कामगारांच्या समस्यांबाबत “महाधरणे आंदोलन” सुरू होण्यापूर्वी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी दालमिया प्रशासन (नारंडा) जिल्हाधिकारी साहेब, कामगार आयुक्त (केंद्रीय) यांना निवेदन देखील दिले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणूनच १०/११/२०२१ पासून पुर्व मुरली कर्मचारी, कंत्राटी कामगार तसेच पूर्व पॅकींग प्लॉट मुरली कामगार मिळून सगळयांनी “महाधरणे आंदोलन” सुरू केले. दरम्यानच्या काळात आंदोलन मोडीत काढण्याचा देखील प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. परंतु महाधरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने सुरू असल्याने पोलीस प्रशासन देखील सहकार्याच्या भूमिकेत आहे. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे सचिन भोयर यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले दालमिया सिमेंट प्रकल्पात काही कार्यरत कामगारांनी आंदोलनस्थळी सहज भेट दिली म्हणून काही कामगारांना जाणीवपूर्वक कामावरून कमि करण्यात आले. त्यांच्यापैकी प्रकल्पग्रस्त कामगार संतोषभाऊ संकुलवार रा. नारंडा यांनी दालमिया सिमेंट कंपनी एच आर उमेश कोल्हटकर व सिनिअर मॅनेजर पराग पानपट्टीवार यांच्या जाचाला कंटाळून काल दि ३/१२/२०२१ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास कंपनी परिसरात विष प्रशासन करून आत्महत्येचा मार्ग पत्करला. कामगाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक असुन उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आता तरी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब यांनी आंदोलनाची दखल घेत पूर्व मुरली कर्मचारी, कंत्राटी कामगार व पॅकींग प्लॉट कर्मचा-यांना न्याय मिळवून द्यावा तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणा-या दालमिया सिमेंट कंपनी एच आर उमेश कोल्टकर व सिनीयर मॅनेजर (एच आर) पराग पानपट्टीवार यांच्यावर आय.पी.सी. अंतर्गत गुन्हा दाखल करावा.