
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
पुणे शहर
गुणाजी मोरे
सर्व अद्ययावत सोयींनी उपयुक्त आणि जनतेच्या सेवेत अखंडपणे कार्यरत असणाऱ्या पुणे शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
अतिशय उत्साह व मोठ्या जल्लोषात हा उदघाटन सोहळा संपन्न झाला.हे कार्यालय म्हणजे पुणेकर जनतेसाठी व नागरिकांसाठी हक्काची जागा .
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील,शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, मुक्ता टिळक,माजी मंत्री दिलीप कांबळे,संजय भेगडे,मा. आ योगेश टिळेकर,बापूसाहेब पठारे, मेधा कुलकर्णी,धिरज घाटे, बाबासेठ मिसाळ, उपमहापौर सुनिता वाडेकर,सभागृह नेते गणेश बिडकर,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, दिपक नागपुरे,दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदिप लोणकर, सुशील मेंगडे, बापू मानकर, अर्चना पाटील, गणेश कळमकर, धनंजय जाधव, यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.