
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
सिने अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशन च्या वतीने मागील दोन दिवसापूर्वी संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ऊस तोड वाहतूक बंद झाली होती अन्नधान्य भिजल्यामुळे मजुरांची उपासमार होत असल्याने नाम फाउंडेशन वतीनेही पंढरपूर तालुक्यातील अनेक ऊसतोड मजुरांना अन्नधान्य किटचे वाटप करून सर्वतोपरी मदत करण्याचे आव्हान माऊली भाऊ हळणवर त्यांनी अनेक संस्थांना आव्हान केले होते याची दखल घेत नाम फाउंडेश ऊसतोड मजुरांना तात्काळ अन्नधान्य पाठवून देऊन त्यांच्या झोपडीपर्यंत मदत पोचवण्याचे काम नाम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल होताहेत त्यामुळे नाम फाऊंडेशन चे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या वतीने नामचे राज्य समन्वयक गणेश थोरात यांचे कडुन ही मदत सोलापुर जिल्हा समन्वयक माऊली हळणवर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.
ही मदत नारायण चिंचोली देगाव सुस्ते ईश्वर वठार अजनसोड बिटरगाव या गावात कामगारांच्या पालावर नेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक लक्ष्मण धनवडे, नाम फाउंडेशन चे राज्य समन्वयक माऊली हळणवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पांडुरंग चे नूतन संचालक किसन सरवदे ,पंकज देवकते अनिल घाडगे दत्ता बोबडे संभाजी चव्हाण पोपटी डुबल पांडुरंग कारखान्याचे शेती विभागाचे राहुल नागणे विष्णू माने, पोपट पाटील, ज्ञानेश्वर बर्डे, संजय चौगुले ,माऊली गुंडगे,सुरज खरात, नागेश काळे, सचिन घाडगे, चिटबाय राजू लेंगरे,भारत गोडगे परमेश्वर डुबल ,मोहसीन शेख,धनाजी सरवदे आदी सह नाम फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते