
भास्कर पेरे पाटील
दै.चालू वार्ता प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार चिंचोली ( प.कं.) ता. कंधार येथील भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव निमित्तानं छ.संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय चिंचोली व ग्राम पंचायत कार्यालय चिंचोली (प.कं.) यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते; या कार्यक्रमात ते उदघाटक म्हणुन होते आदर्श गाव बणवायच आसेल तर नियमित कर लोकांच सहकार्य लोकविश्वास महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे सरपंच हेआईचे हृदय बणुन जर कामे केली तर गाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकायला वेळ लागणार नाहि असे वक्तय त्यांनी केले मी काय केलय पाटोदा ग्राम पंचायत महाराष्ट्रात कशी आदर्श बणली याचे अनेक दाखले त्यांनी दिले.छ.संभाजी महाराज सार्वजनिक वाचनायात दिवाळीअंकाच उदघाटण व प्रदर्शन माजी सनदीआधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.एकनाथ उर्फ आनिल मोरे व आदर्श सरपंच मा.भास्कर पेरे पाटील व कंधार पंचायत समिति गठविकास आधिकारी मा.माजरंमकर साहेब यांच्या शुभहस्ते दिवाळी अंकाच उदघाटण रितसर करण्यात आले.या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक श्री.सुधाकर कौंसल्ये यांनी कार्यक्रमचे प्रस्ताविक केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोरे साहेब होते आनिल मोरे साहेबांनी आपल्या आमोघ वाणीतुन ग्रामीण विद्यार्थी शहरामध्ये कसा अधिकारी म्हणून चमकला पाहिजे कशी छाप पाडली पाहिजे याचा सविस्तर विवेचन मोरे साहेबांनी मांडले तर गटविकास आधिकारी मा.माजरंमकर साहेबानी या गावाला आदर्श गाव बणायला कुठलीच अडचण नाहि असे म्हणाले या चिंचोली व पंचक्रोशीतील आजी व माजी सरपंच सदस्य व गावातील मातभर नेते मंडळी लहाण थोर मोठ्या प्रमाणात महिला सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाच मन्याडी बाणाणे प्रचंड झपाटलेला दक्षिण भारतात प्रसिद्ध माळेगाव याञा व अख्य माळेगाव बोलणीतुन काबुत ठेवणारे माजी प्राचार्य निवृत्ती कौंसल्ये यांनीही गावाला संबोधीत केले कर्तबगार मायभुमीला नतमस्तक होतो म्हणाले या कार्यक्रमाच सुञसंचलन परशुराम कौंसल्ये यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छ.स.सा.वा चे उपाध्यक्ष प्रा सुधाकर श्री.कौंसल्ये सचिव तानाजी पा.कौंसल्ये ग्रंथपाल संभाजी कौंसल्ये प्रा.आरुण कौंसल्ये साहेबराव बोटेवाड माधव कौंसल्ये यांनी परिश्रम घेतले