
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी अरुण भोई
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची खंडीत केलेली वीज जोडणी पूर्ववत करण्याकरता केलेले
प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन यशस्वी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी वरवंड या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले शो लिस्ट स्टाईल आंदोलन दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे मागे घेतले .
१ डिसेंबर रोजी दुपारी वरवंड येथील टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली होती दिवसभरात यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब तसेच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री येडके साहेब यांनी या आंदोलनाला भेटी दिल्या होत्या पण त्या दिवशी काही तोडगा निघाला नाही . सायंकाळी सात वाजता महावितरण वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता येडके साहेबांनी कमीत कमी वीज बिल भरावे अशा आशयाचं पत्र पाठवून दिले या पत्रातील निर्णयाला आंदोलनकर्त्यांनी दुजोरा दिला नाही त्यानंतर हे आंदोलन पुढं चालू राहिलं .
प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस शैलेश शिपलकर उपाध्यक्ष रफिक भाई सय्यद ‘ शंकर काळे युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल दोरगे ,राहुल शेलार ,अनिल अमनर ,रामदास फाजगे नंदकुमार भागवत , विजय आटोळे ,भरत मोरे , विशाल गायकवाड , मनोज जाधव आणि काही शेतकरी बांधव मिळून २० जन या शोले स्टाईल आंदोलन सहभागी झालो होते .
काही कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव लघुशंकेसाठी आणि नाश्त्यासाठी खाली गेले होते असता त्यांना पोलीस अधिकारी यांनी त्यांना खाली रोखून ठेवले.
रात्री टाकी वरचं आंदोलन कर्त्याचा मुक्काम असताना जोराचां वारा , पाऊस कडाक्याची थंडीत रमेश शितोळे – देशमुख , रफिक सय्यद , प्रकाश जामले
राहुल दोरगे हे चौघे जन मुक्कामी टाकी वर असताना
मध्यरात्री एकच्या पुढे टाकी वर ची ताडपत्री जोरदार वाऱ्या मुळे उडून चालली होती कशी बशी ती चौघानी पकडली आणि ताडपत्री चार कोपर्यात चौघांनी पकडून पहाटे साडेचार वाजे पर्यंत भरपावसांत बसुन होते .
थंडी ,वाऱ्याची पर्वा न करता शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढा चालु ठेवला होता .
दुसऱ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने आंदोलनकर्त्यांचा चहा ,पाणी, नाष्टा बंद केल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी सारखी पाण्याच्या टाकीवरचं अन्नपाणी त्याग आंदोलन सुरू केले .
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आमचा अंत पाहिला आणि आज वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर आज सांयकाळी ५ वाजता या आंदोलनाची दिशा उग्र राहील असा मेसेज आंदोलन कर्त्यांनी महाराष्ट्र राज्य वितरण कंपणी दिल्या मुळे
दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब महाराष्ट्रा वीज वितरण कंपनीचे अधिकारी मालपे साहेब , पाटस पोलीस स्टेशनचे
उपनिरीक्षक संजय नागरगोजे साहेब यांनी आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना लेखी आश्वासन दिले.
यावेळी वरवंड गावचे माजी सरपंच गोरख दिवेकर , सुनील सातपुते,दारूबंदी चे अध्यक्ष मंगेश फडके , प्रमोद शितोळे ,बाबाराजे जगताप, सुभाष दिवेकर ,शरद दिवेकर , अनिल फरगडे ,मोहन आटोळे ,पत्रकार विजय मोरे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते .