
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
काटकळंबा:- अहिल्याबाई सोनबा कुठारे वय 55 वर्ष व्यवसाय घरकाम व मजुरी रा. काटकळंबा ता.कंधार समक्ष पो.स्टेशनला फिर्याद दिली असून या फिर्यादीमध्ये काटकळंबा येथील राहणारी असून तीला दोन मुले एक मुलगी आहे.मुलीचे लग्न झाले असून तीचे पती 30 वर्षापूर्वी मरण पावले आहेत. एक मुलगा अपंग आहे.त्याचे लग्न झाले आहे. त्याच्यासोबत ती एकत्र राहते. दि.२७/११/२०२१ रोजी सायंकाळी 7 वाजता ते सर्व घरी असताना त्यांच्या वाड्यातील शिवाजी हनुमंत कुठारे हा दारू पिवून घरी आला व म्हणाला तुमच्या घरी गावातील कोणतेही माणसे का येतात,त्यांना वाड्यात येवू देऊ नका तेव्हा अहिल्याबाई म्हणाली आम्ही मजुरदार आहोत कामाकरिता आम्हाला कोणीही बोलावते त्यामध्ये तुम्हाला काय भास आहे असे म्हणत असताना शिवीगाळ करु लागला.तेव्हा अहिल्याबाईची सुन सुनिता कुठारे सासुबाईला काय बोलता असे म्हणाली तिथे सोनाली कुठारे व आशा कुठारे हे आले. शिवाजी कुठारेने अहिल्याबाईला व सुनीताला धरून जमिनीवर पाडले; मारहान करून तुम्ही जर आमच्या नादाला लागल्या तर जीवंत ठेवणार नाही तुमच्या मागे गडीमाणूस नाही. भांडण चालू असताना मारोती झुलवाड व माधव झुलवाड हे साक्षीदार होते.अहिल्याबाईच्या कुंटुंबास धोखा असून त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी.सदर भांडणात अहिल्याबाई व सुनिता यांना मुक्कामार लागला आहे.